सगर वंशीय जिरे माळी समाजातील समाजधुरीणांनी समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळण्याच्या हेतूने २१ मार्च १९६७ रोजी “सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था सिन्नर” या संस्थेची स्थापना केली आणि खर्या अर्थाने सिन्नर शहरात शैक्षणिक कार्य सुरू झाले. पाहतापाहता या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले.
संस्थेने जून १९६८ रोजी महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालयाचा इ. ८ वीचा वर्ग भद्रकाली मंदिर, लोंढे गल्ली येथे सुरू केला. विद्यार्थ्यांच्या वाढत्या शैक्षणिक गरजा लक्षात घेता संस्थेने स्वतःच्या जागेत विविध भौतिक सुविधांसह भव्य इमारतीत जून १९९० मध्ये "महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विभाग (कनिष्ठ महाविद्यालय)", जून १९९१ मध्ये सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्या मंदिर, ऑगस्ट १९९३ किमान कौशल्य व्यावसायिक अभ्यासक्रम, ११ जुलै १९९७ मध्ये दुरशिक्षण अभ्यासकेंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक सुरू केले. आज जावळपास ५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहेत.
कला वाणिज्य विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शंभर टक्के निकालाची परंपरा कायम. बोर्ड परीक्षा विषय निहाय मार्गदर्शन, सराव परीक्षा म ार्गदर्शन, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शाखा निहाय विविध क्षेत्राची निवड करण्यासाठी समुपदेशन. PPT द्वारे विषयाचे अध्यापन केले जाते. त्यामुळे अध्ययनात विद्यार्थ्यांचे रुची वाढते. वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी निवड परीक्षांचे विशेष मार्गदर्शन, व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन जॉब ट्रेनिंग साठी योग्य निवड, स्वतःची व्यवसाय निवडीसाठी मार्गदर्शन केले जाते. Read More
एकूण विद्यार्थ्यांपैकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून त्यात मुलींचे प्रमाण 70 टक्के आहे. विद्यार्थिनींसाठी विश ष समुपदेशन, स्वसंरक्षण, अडचणीच्या वेळी समय सूचकता, भविष्यातील संभाव्य धोके, कुटुंबासाठी आपले स्वतःचे योगदान, इ. विषयी समाजातील उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांची व्याख्या देऊन मार्गदर्शन केले जाते. Read More
गुणोत्तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रेरणा देण्यासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती, भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी शैक्षणिक िष्यवृत्ती योजना, आदिवासी मुला मुलींना भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, विडी कामगार मुला मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना दिली जाते. Read More
" शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.;" ━━━━✧❂✧━━━━
" पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही." ━━━━✧❂✧━━━━
" विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते. " ━━━━✧❂✧━━━━
" आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते…. ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.:" ━━━━✧❂✧━━━━
" वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. " ━━━━✧❂✧━━━━
" ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते. " ━━━━✧❂✧━━━━
" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. अर्धवट ज्ञानी म्हणजे दुःखाचा धनी. " ━━━━✧❂✧━━━━
" पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही. " ━━━━✧❂✧━━━━
" आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही. " ━━━━✧❂✧━━━━
" शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे, जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता. " ━━━━✧❂✧━━━━
" शिक्षक जीवनाचे दार उघडत असतो, तर विद्यार्थ्यालाच त्यातुन प्रवेश करायचा असतो. " ━━━━✧❂✧━━━━
" जो द्रव्य वाढवितो तो काळजी वाढवतो, परंतु जो विद्या वाढवितो, तो मान वाढवतो. " ━━━━✧❂✧━━━━
" नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे. " ━━━━✧❂✧━━━━
"कले शिवाय जीवन म्हणजे सुगंधा शिवाय फुल आणि प्राणा शिवाय शरीर."
"चांगले मित्र, चांगला परिवार आणि सुंदर विचार ज्याच्या कडे आहेत त्याला जगातील कोणतीच शक्ती हरवू शकत नाही."
मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो, मेहनत तर सगळेच करतात, पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात.
"जर तुम्हाला सूर्याप्रमाणे चमकायचे असेल तर आधी सूर्याप्रमाणे जळायला शिका."
"तुम्ही तोपर्यंत हरत नाहीत, जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणे थांबवत आहे."
We are providing many courses
The findings from all teachers and their students who perceived their teachers' practices and their learning experiences as engaging and effective are discussed in our college.
महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयावर पालकांकडून कौतुकाची थाप
“महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयावर पालकांकडून कौतुकाची थाप ” सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले कनि ्ठ महाविद्यालयात दि.०२ सप्टें २०२३ रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. याप्रसंगी उच्च माध्यमिक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.श्री. दिंगबरजी पगर साहेब कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. नामदेवराव लोंढे साहेब आणि संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री. नामदेवराव लोणारे साहेब उपस्थित होते. त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री. दत्तात्रय गोळेसर साहेब, संस्थेचे सहसेक्रेटरी मा.श्री. सुधाकर गोळेसर, मा.श्री. दत्ता झगडे (खजिनदार स. वि. प्र. शिक्षण संस्था), मा.श्री. दत्तात्रय लोंढे (शा.व्य.स. अध्यक्ष माध्यमिक), मा. सौ. सरलाताई वरंदळ (शा.व्य.स. अध्यक्ष प्राथमिक), संस्थेचे सन्माननीय संचालक मा.श्री. रामनाथ बलक, मा.श्री. जूगल गवळी, मा.श्री. मधुकर खर्जे, मा.श्री. दत्तात्रय लोणारे, मा.श्री. संजय माळी, मा.श्री. संदीप गवळी, संचालिका मा. सौ. मंगलताई झगडे, संस्थेचे मार्गदर्शक संचालक मा.श्री. बाबासाहेब भगत, मा.श्री. संजय लोंढे, मा.श्री. मदन लोणारे, मा.श्री.प्रतीप गोळेसर, मा.श्री. मनोज महात्मे, पालक प्रतिनिधी मा. श्री. तातू जगताप, मा. श्री. राजेंद्र लोणारे, विद्यार्थिनी प्रतिनिधी नीलम करडग, संकुलाचे प्राचार्य मा.श्री. रामनाथ लोंढे, उपप्राचार्य मा.श्री. तानाजी ढोली, उपप्राचार्य मा.श्री. राजेंद्र भालेराव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्व पालक उपस्थित होते. पालक मेळाव्याचे औचित्य साधून महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विद्यार्थी सुरक्षितेसाठी “ClassMe” या सॉफ्टवेअर चे उद्घाटन पालकांच्या साक्षीने करण्यात आले. “ClassMe” चे संस्थापक अध्यक्ष यांनी १२ वी विज्ञान शाखेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला रोख ११००० रु. व ट्रॉफी देवून “ClassMe AWEARD” ची घोषणा केली. याप्रसंगी महाविद्यालयाकडून पुरविण्यात येणाऱ्या भौतिक सुविधा आणि यावर्षी राबविण्यात आलेले उपक्रम हे स्लाईड-शो च्या माध्यमातून दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. दिंगबरजी पगर साहेब पालकांचे स्वागत करून पालकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले. संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. नामदेवराव लोणारे साहेब यांनी आपल्या वक्तव्यातून ऑनलाइन प्रणालीद्वारे संस्था, शिक्षक, विद्यार्थी व पालक हे जोडले जातील असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी संस्थचे व कनिष्ठ महाविद्यालयाचे नेहमी योगदान असेल याची खात्री पालकांना दिली. संस्थेचे संचालक मा.श्री. रामनाथ बलक यांनी पालक म्हणून तुम्ही जबाबदारी स्वीकारा असे आव्हान केले व तुमच्या पाल्याला पूर्णपणे सुरक्षितता देण्याचे काम संस्था करेल असे आश्वासन दिले. संस्थेचे मार्गदर्शक संचालक मा.श्री. बाबासाहेब भगत यांनी विद्यार्थी गुणवत्ता व शिष्यवृत्तीबाबत मार्गदर्शन केले. मार्गदर्शक संचालक मा.श्री. प्रतिप गोळेसर यांनी करिअर मार्गदर्शन कक्ष उभारण्याचे आश्वासन देले. मार्गदर्शक संचालक मा.श्री. संजय लोंढे यांनी मोबाईलचा वापर योग्य कामासाठी करा असे सांगितले. मार्गदर्शक संचालक मा.श्री. मनोज महात्मे यांनी पालक, शिक्षक, व संस्थाचालक यांच्यामध्ये कायम समन्वय राहील व विद्यार्थ्यांची गुणवत्ता व सुरक्षितता याची जबाबदारी संस्थेने घेतली आहे असे आश्वासन दिले. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.श्री. तानाजी ढोली यांनी प्रास्ताविक करताने कनिष्ठ महाविद्यालयाच्या भौतिक विकास व गुणवत्ता वाढीचा आलेख पालकांसमोर मांडला. पालक आणि विद्यार्थी हे संस्थेचा व महाविद्यायाचा एक अविभाज्य घटक असून त्यांच्यामुळेच महाविद्यालयाचे नाव मोठे झाले आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांकृतिक विभाग प्रमुख श्री. अमोल आंबेकर यांनी केले Read More
कु. ज्ञानेश्वरी विलास लोंढे ही प्रथम क्रमांकाने विजयी
येवला येथे झालेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२३-२४ मध्ये आपल्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक संकुलातील कु. ज्ञानेश्वरी वि ास लोंढे ही प्रथम क्रमांकाने विजयी झाली व कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र झाली आहे. सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. नामदेवराव लोंढे, सेक्रेटरी मा. श्री नामदेव अण्णा लोणारे, संस्थेचे सर्व पदाधिकारी व संकुलाचे प्राचार्य श्री रामनाथ लोंढे सर, उपप्राचार्य ढोली सर यांनी विजयी खेळाडूचे व तिला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक किरण मिठे, सागर नन्ने व रोहिणी शिंदे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. येवला येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत तिच्यासमवेत मा. श्री. बंगाळ सर, श्री. किरण मिठे सर,श्री.अनिल गोसावी सर व तिचे पालक विलास लोंढे हे उपस्थित होते. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला Read More
वैकुंठधाम, नागेश्वर मंदिरात स्वच्छता मोहीम
वैकुंठधाम, नागेश्वर मंदिरात स्वच्छता मोहीम प्रतिनिधी सिन्नर सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले शैक्षणिक संकुलात महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छतेसाठी दोन तास श्रमदान मोहीम राबविण्यात आली. संस्थेचे सचिव नामदेव लोणारे, थ उच्च माध्यमिक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष , दिगंबर पगार, संचालक संजय २, माळी उपस्थित होते. प्राचार्य क रामनाथ लोंढे, सावित्रीबाई फुले ह प्राथमिक विद्या मंदिराच्या प मुख्याध्यापिका संगीता राजगुरू, उपप्राचार्य तानाजी ढोली, राजेंद्र भालेराव, पर्यवेक्षक रमेश बलक यांच्यासह शिक्षक, विद्यार्थ्यांनी महात्मा फुले संकुल परिसर, वैकुंठधाम, नागेश्वर देवस्थानची स्वच्छता केली. स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. स्वच्छतेतून भारतीय ि संस्कृतीचे दर्शन होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेविषयी जागृत राहणे आवश्यक असल्याचे मत नामदेव लोणारे यांनी व्यक्त केले. संचालक दिगंबर पगार यांनी स्वच्छता अभियानासाठी लागणारे डिस्पोजेबल हॅण्ड ग्लोव्हज, कॅप, मास्क असे साहित्य उपलब्ध करून दिले. प्राचार्यांनी स्वच्छता अभियानासाठी हरित सेनेचे सदस्य, विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या नियोजनाचे कौतुक केले. मुख्याध्यापिका राजगुरू यांनी मनोगत व्यक्त केले. किरण मिठे यांनी आभार मानले Read More
महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन
"राष्ट्रपिता जोतीराव फुले" यांचा स्मृतीदिन आहे. "समाजपरिवर्तनासाठी आपले आयुष्य झोकणारे, शिक्षणमहर्षी थोर भारतीय समाजसुधाकर, "महात मा ज्योतिबा फुले" यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन"....! महात्मा ज्योतिबा फुले जु. महाविद्यालय सिन्न Read More
All School celebration images
Review by classmee associate Students who belong from any school/coachings or self preparation
The college will provide us all the necessary facilities we need in a course for example all the labs and other stuffs are av ailable for our courses also classrooms laboratories and libraries sports centre are decent. The school is around 50 year. Everything is well maintained and also everything is clean Read More
My college helped me in achieving my full potential. I love the family like atmosphere that surrounds me.The teachers are alw ays ready to help. And the library contains a humongous amount of books to facilitate students. • With the help of my teachers, blessings of my parents, and a lot of hardwork Read More
I feel proud and thankful to be a part of this college. Teaching facilities are excellent in every way. The thing I like the most is it’s family like atmosphere. Teachers are always ready to help their students in every possible way. This college creates so much opportunities for students by organizing other co-curricular activities Read More
To provide students with a safe and secure learning environment where they get the highest quality of education. It wants to provide its student with important skills so that they can develop into progressive thinkers. Along with all this, the school wants to prepare its students for the future in a wa Read More
I have studied in M J Phule college from last year. I think M J Phule college tends to be very focused on maths and science. The course is very good here. All subjects are practical ones. Students get to choose many optional subject Read More
लोकमत तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये महात्मा फुले विद्यालयाची बाजी लोकमत न्यूज नेटवर्क िन्नर : छत्रपती राजर्षी शाहू महाराज तालीम संघात आयोजित तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा जोतिबा फुले विद्यालयातील कुस्तीपटूंनी विविध गटात प्रथम क्रमांक मिळवून ते जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. १४ वर्षांतील ३३ किलो वजनी गटात कुमारी तृप्ती नारायण लोंढे ही प्रथम आली. ३९ किलो वजनी गटात प्राप्ती संजय डगळे प्रथम तसेच ५० किलो वजनी गटात भूमी भरत गोळेसर प्रथम आली. त्याचप्रमाणे १७ वर्षांतील ४० किलो वजनी गटात मयुरी कैलास गवळी, १९ वर्षांखालील मुलांच्या गटात ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत ६० किलो वजनी गटात अनंत नितीन वरंदळ हा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत महात्मा फुले विद्यालयाचे यशस्वी खेळाडू. खेळाडू प्रथम आला. ८२ किलो ग्रीको रोमन वजनी गटात कृष्णा प्रवीण पाचोरे प्रथम आला. ६१ किलो फ्री स्टाइल गटात श्रीराम हरिभाऊ गायकवाड याने यश मिळविले. मुलींच्या १९ वर्षांतील संघातून ज्ञानेश्वरी विलास लोंढे ही खेळाडू ६८ किलो वजनी गटात प्रथम आली. गायत्री नामदेव डगळे ही ५५ किलो वजनी गटात प्रथम आली. यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक किरण मीठे, सागर नन्ने व रोहिणी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य रामनाथ लोंढे तसेच सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेव लोंढे, सचिव नामदेव लोणारे व सर्व संचालक मंडळाने खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
Read Moreसिन्नर : अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागताप्रसंगी शिक्षक. अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स वागत सिन्नर : येथील महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबर पगर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य आर. इ. लोंढे, उपप्राचार्य प्रा. तानाजी ढोली, प्रा. राजेंद्र भालेराव, प्रा. अलका खैरनार, प्रा. एकनाथ माळी, विद्यार्थिनी प्रतिनिधी नीलम करडग उपस्थित होते. दिगंबर पगर यांनी विद्यार्थ्यांनी ध्येयापासून विचलित होऊ नये. ध्येयप्राप्तीसाठी अभ्यासात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. प्राचार्य लोंढे यांनी उपस्थित विद्यार्थ्या
Read Moreयेथील सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतिबा फुले संकुलात रोटरी क्लब ऑफ सिन्न रच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नामदेव लोंढे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सुरेंद्र देशमुख उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे सेक्रेटरी नामदेव लोणारे, उपाध्यक्ष दत्तात्रय गोळेसर, दिगंबर पगर, सुधाकर गोळेसर, दत्तात्रय लोंढे, संदीप गवळी, रोटरी क्लबचे अध्यक्ष स्नेहल भगत, सेक्रेटरी अॅड. राहुल दराडे, कैलास क्षत्रिय, वैभव मुत्रक, उदय गायकवाड, माजी क्रीडा शिक्षक एन. एच. महात्मे, भाटवाडीचे सरपंच मनोज महात्मे, प्राचार्य आर. ई. लोंढे, उपप्राचार्य टी. एस. ढोली, उपप्राचार्य आर. एस. भालेराव, पर्यवेक्षक रमेश बलक, उपमुख्याध्यापक एम. एन. देशमुख उपस्थित होते. तहसीलदार देशमुख यांनी रोटरी क्लबच्या उपक्रमाचे कौतुक केले. सेक्रेटरी लोणारे यांनी आजपर्यंत क्लबच्या माध्यमातून संस्थेला केलेल्या मदतींचा उल्लेख करुन त्यांचे आभार मानले. भगत यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सायकलिंगचे व्यायामातील महत्त्व पटवून दिले. उपाध्यक्ष गोळेसर यांनी यापुढेही संस्थेसाठी क्लबच्या विविध उपक्रमातून सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले. प्राचार्य लोंढे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन टी. एस. फडके यांनी केले. रमेश बलक यांनी आभार मानले
Read Moreलोकमत मुलींच्या कबड्डी स्पर्धेत महात्मा फुले विद्यालयाचे दोन संघ विजयी तालुकास्तरीय मुलींच ्या कबड्डी स्पर्धेत सिन्नरच्या महात्मा फुले विद्यालयाचे विजयी ठरलेले दोन संघ. लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत महात्मा फुले विद्यालयाचे दोन संघ विजयी ठरले. तालुक्यातील पांढुर्ली येथे झालेल्या तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत महात्मा फुले विद्यालयाचा १४ वर्षांआतील मुलींच्या संघाने फायनलमध्ये एस. एस. विद्यालय गुळवंच या संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक मिळवला. तसेच १९ वर्षांआतील मुलींच्या कबड्डी संघाने माध्यमिक विद्यालय दातली या विद्यालयाच्या मुलींच्या संघाचा फायनलमध्ये पराभव करून प्रथम क्रमांक मिळवला. हे दोन्ही संघ नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सिन्नर तालुक्याचे नेतृत्व करणार आहेत. Hello Nashik Gramin Page No. 4 Sep 12, 2023 Powered by: erelego.com विजयी खेळाडूंना क्रीडाशिक्षक किरण मिठे, सागर नन्ने व रोहिणी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेव लोंढे, नामदेव लोणारे, निवृत्ती महात्मे, मुख्याध्यापक रामनाथ लोंढे, रमेश बलक, मधुकर देशमुख यांनी विजयी संघाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
Read Moreतालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत ७२ संघ सहभागी फुले विद्यालयात उद्घाटन, साखळी सामन्यात भोर, ुले विद्यालयाची बाजी सिन्नर : पुढारी वृत्तसेवा सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा जोतिबा फुले विद्यालयात दि. २२ व २३ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा उत्साहात झाल्या. यात ७२ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये तालुक्यातून १४ वर्षाआतील मुलांचे ३० संघ, १७ वर्षाआतील मुलांचे ३२ संघ व १९ वर्षाआतील मुलांचे १० संघ सहभागी झाले होते. ५८ साखळी सामने झाले. क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन माजी क्रीडाशिक्षक दशरथ लोढ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक दत्तात्रेय लोंढे होते. यावेळी सुनील सिन्नर : महात्मा फुले विद्यालयात तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेतील एक क्षण. 'गवळी, शेखर गोळेसर, भाटवाडीचे सरपंच मनोज महात्मे, सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेव लेढि, सचिव नामदेव लोणारे, उपाध्यक्ष दत्तात्रेय गोळेसर, संचालक संजय माळी, सुधाकर गोळेसर, दिगंबर पगर, संचालिका मंगल झगडे, सरला वरंदळ उपस्थित होते. प्राचार्य रामनाथ लोड यांनी प्रास्ताविक केले. क्रीडा संयोजक पिरन खैरनार, मनोज महात्मे व संस्थेचे सचिव नामदेव लोणारे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. विजयी संघ : १४ वर्षाआतील मुलांचा पु. रा. भोर विद्यालय, ठाणगाव हा संघ विजयी झाला. १७ वर्षांआतील महात्मा जोतिबा फुले विद्यालयाच्या संघाने ब्रह्मानंद दोडी या संघाचा ७ गुणांनी पराभव करून विजय मिळवला. १९ वर्षाआतील महात्मा जोतिबा फुले ज्युनिअर कॉलेजच्या संघाने नवजीवन डे ज्युनिअर कॉलेजचा पूर्ण १ डावाने पराभव केला. स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक किरण मिठे, सागर नन्ने, रोहिणी शिंदे, नवले, चव्हाण, शिंदे, आकाश लोणारे, ऋतिक सुकेणकर, संदीप लोणारे यांनी प्रयत्न केले
Read Moreमहात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांना फक्त वाचून नव्हे तर आचरणात आणून त्यांना समजावे. फुले या ना महात्मा ही पदवी महात्मा गांधींनी दिली होती. सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे प्रथम फुले यांनीच उघडी करून दिल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त नायब तहसीलदार दत्ता वायचळे यांनी केले. सगर विद्या प्रसारक शिक्षण मंडळाच्या महात्मा जोतिबा फुले संकुलात फुले यांच्या १३३ व्या स्मृतिदिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्थेचे सचिव नामदेव लोणारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष नामदेव लोंढे, गटशिक्षणाधिकारी डॉ. विजय बागुल, अशोक झगडे, सोपान लोणारे, संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय गोळेसर, उच्च शालेय समिती अध्यक्ष दिगंबर पगर, माध्यमिक विभाग अध्यक्ष दत्तात्रय लोंढे, संचालक मधुकर खजें, दत्तात्रय लोणारे, संजय माळी, संदीप गवळी, संचालिका मंगल झगडे, प्राचार्य रामनाथ लोंढे आदी उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात आली. महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्ररथ तयार करण्यात आला होता. विद्यालयात ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. बस स्थानकाजवळील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. सहभागी लेझीम व बँड पथकाने रॅलीची शोभा वाढवली. कार्यक्रम यशस्वितेसाठी संस्थेचे पदाधिकारी, महात्मा फुले शैक्षणिक संकुलाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. गटशिक्षणाधिकारी बागुल यांनी विद्यार्थ्यांना आपण महात्मा फुले विद्यालयात शिकतात म्हणून आपण भाग्यवान आहात, असे मनोगत व्यक्त केले. संचालक रामनाथ बलक यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केल्याची माहिती दिली. लोणारे यांनी फुले यांच्या जीवनचरित्रावर माहिती दिली. उपप्राचार्य टी. एस. ढोली यांनी प्रास्ताविक केले. सविता काठे यांनी सूत्रसंचालन केले. एम. एन. देशमुख सर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले
Read Moreमहात्मा ज्योतिबा फुले कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेड र यांना आदरांजली.... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.ढोलीसर, प्रमुख वक्त्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती खैरनार मॅडम सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांच्या उपस्थिती कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा भारतीय संविधानाचा खास करून उल्लेख करण्यात आला देशाच्या सामाजिक विकासातील अडचणींचा अभ्यास करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विकासातील ऐक्य साधून राष्ट्रीय एकात्मता साधली. समाजातील मागासवर्गीय शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी 20 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लिहून कायदा तयार करण्यात आले. आजही त्याची अंमलबजावणी होत आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कला वाणिज्य विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Read Moreसगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय, सिन्नर याठिकाणी दि. ०८-१२-२०२३ रोजी SMBT दंत रुग्णालयामार्फत दंत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये महाविद्यालयातील ६५ मुली व ४५ मुले अशा एकूण ११० विद्यार्थ्यांनी दंत तपासणी करून घेतली. याप्रसंगी SMBT दंत रुग्णालयाची १० डॉक्टरांची टीम उपस्थित होती. या सर्वांचे स्वागत कानिष्ट महविद्यालयाच्या वतीने उपप्राचार्य तानाजी ढोली सर यांनी केले
Read Moreबुधवार दि.१३.१२.२०२३ रोजी उच्च माध्यमिक शालेय व्यवस्थापन समितीची सहविचार सभा मा.श्री. दिगंबरजी पगर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री. नामदेव लोणारे साहेब, पालक प्रतिनिधी मा.श्री. राजेंद्र लोणारे, उपप्राचार्य श्री. तानाजी ढोली, शिक्षक प्रतिनिधी श्री. राहुल वरंदळ, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. निलम करडग, श्री. एकनाथ माळी सर, श्री. संजय गुजर सर, श्री. अनिल गोसावी सर उपस्थित होते. सहविचार सभेमध्ये विद्यार्थी गुणवत्ता, शैक्षणिक सहल, विद्यार्थी करियर मार्गदर्शन व समुपदेशन, १२ वी विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षाची पूर्वतयारी, उ.मा. कडील निवडश्रेणी या सर्व विषयांवर साधक बाधक चर्चा करून त्या संदर्भात नियोजन करण्यात आले. संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री. नामदेव लोणारे साहेब यांनी उच्च माध्यमिकच्या शिक्षकांसमवेत संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आव्हान केले. नवीन तंत्रज्ञान ClassMee App चा वापर जास्तीत जास्त करावा व त्याद्वारे वस्तुनिष्ठ प्रश्न व सराव परीक्षा घेण्याची सूचना केली. विद्यार्थी आपला केंद्रबिंदू असून सर्व शिक्षकांनी त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे. शैक्षणिक सुविधांसाठी संस्था आपल्या सोबत आहे असे आश्वासित केले. मा.श्री. दिगंबरजी पगर साहेब यांनी शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा केली व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल आयोजित करून त्याचे योग्य नियोजन करावे असे सांगितले. पालक प्रतिनिधी श्री. राजेंद्र लोणारे यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या कामकाजा बाबत समाधान व्यक्त केले. उपप्राचार्य श्री.ढोली सर यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नियोजनाची माहिती उपस्थितांना दिली. शिक्षक प्रतिनिधी श्री. राहुल वरंदळ यांनी शैक्षणिक सहलीचा मार्ग, सहली दरम्यान विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, तसेच सहली दरम्यान विद्यार्थ्यांची काळजी घेण्याकरीता करण्यात येणारे नियोजन संदर्भात माहिती दिली. सर्व उपस्थितांचे आभार श्री.एकनाथ माळी सर यांनी मांडले
Read Moreसगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयात दि.२७ डिस ें २०२३ रोजी पालक व विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व समुपदेशन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी करिअर मार्गदर्शक मा.प्रा.संतोष कारले यांनी पालक व विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेंचे सेक्रेटरी मा.श्री. नामदेवराव लोणारे साहेब विराजमान होते. प्रमुख अतिथी संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री. दत्तात्रय गोळेसर साहेब, मा.श्री. दिंगबरजी पगर साहेब (शा.व्य.स. अध्यक्ष उ.माध्यमिक), संचालिका मा. सौ. मंगलताई झगडे, संस्थेचे मार्गदर्शक संचालक मा.श्री. बाबासाहेब भगत तसेच पालक प्रतिनिधी, मा. श्री. राजेंद्र लोणारे, श्री. माणिक लोंढे, श्री. राविद्र शेळके, श्री. विलास लोणारे, श्री. अर्जुन गोळेसर, श्री. रघुनाथ शिरसाठ, सौ. श्रद्धा लोंढे, सौ. सारिका जाधव संकुलाचे प्राचार्य मा.श्री.रामनाथ लोंढे, पर्यवेक्षक मा.श्री.मधुकर देशमुख, उपप्राचार्य मा.श्री. तानाजी ढोली, उपप्राचार्य मा.श्री. राजेंद्र भालेराव, विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मा.प्रा.संतोष कारले यांनी विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन करताना १०-१२ वी नंतर विद्यार्थांना उपलब्ध असणाऱ्या विविध संधींबद्दल मार्गदर्शन केले. मोबाईलचा वापर शैक्षणिक माहिती व उपलब्ध असणाऱ्या करिअर संबधी संधी शोधण्यासाठी करावा. करिअरसाठी फक्त पैसाच लागतो असे नाही तर बुद्धिमत्ता असणेही गरजेचे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री. नामदेवराव लोणारे साहेब यांनी संस्थेची यशोगाथा सांगितली.आजचे युग स्पर्धेचे युग असून त्यात टिकण्यासाठी गुणवत्ता सिद्ध करणे गरजेचे आहे. वेळेचा सदुपयोग करून कुटुंब व समाजाचा विकास करावा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.श्री. तानाजी ढोली यांनी प्रास्ताविकातून शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत आपली दिशाही निश्चित केली पाहिजे व त्यासाठी योग्य मार्गदर्शन फार महत्वाचे आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदविला. कु.ऋतुजा बलक, कु.प्रतीक्षा लोंढे, कु.हर्षल ताजणे, कु.साई लोणारे, कु.प्रणव माळवे, कु.डगळे गायत्री, कु.करण कांडेकर या विद्यार्थांच्या शंकांच योग्य समाधान मा.प्रा.संतोष कारले यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचा परिचय प्रा.एकनाथ माळी यांनी करून दिला. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अमोल आंबेकर व प्रा. तृप्ती फडके यांनी केले
Read MoreFeel free to reach out to us and we’ll get back to you. If you have any questions just email us, we’re always happy to help!
Just send us your questions or concerns by starting a new case and we will give you the help you need.
Alumni students list